मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमकथांचा ओघ नेहमीच चालू असतो, पण Rubaab हा सिनेमा त्या चौकटीत राहून ही वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी या चित्रपटातून एक आधुनिक, स्वाभिमानी आणि वास्तववादी प्रेमकथा मांडली आहे.
‘रुबाब’ हा सिनेमा मोठ्या आवाजात काही सांगत नाही, पण शांतपणे मनात घर करतो.

#Drama #Romantic
आमचे रेटिंग – ★★★★☆

‘रुबाब’ ही केवळ गोडगुलाबी प्रेमकथा नाही. ही एका आत्मविश्वासू तरुणाची आणि त्याच्या प्रेमप्रवासाची कथा आहे, जिथे प्रेमासोबत स्वाभिमान, स्वतःची ओळख आणि भावनिक संघर्ष यांना तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे.

कथा हळूहळू उलगडत जाते आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते.

प्रेम म्हणजे फक्त त्याग की स्वतःला जपणं ?

संभाजी ससाणे यांनी साकारलेला नायक प्रभावी आणि वास्तववादी वाटतो, शितल पाटील यांनी भूमिकेला भावनिक खोली दिली आहे.दोघांची chemistry खूप subtle आहे – overacting नाही, drama नाही… फक्त real emotions!


  • Thoughtful cinema
  • सिनेमॅटोग्राफी सुंदर
  • संगीत आणि गाणी कथेला पूरक
  • संवाद आधुनिक आणि तरुणाईला भिडणारे
  • वास्तववादी प्रेमकथा
  • मजबूत अभिनय
  • क्लायमॅक्स प्रभावी आणि विचार करायला लावणारा
  • भावनांचा संतुलित वापर

दिग्दर्शकाने कथा साध्या पद्धतीने मांडली असून अनावश्यक नाट्य टाळलं आहे.

#Rubaab #Rubaab_Marathi_Movie #zee5 #Multimediainmarathi

Multimediainmarathi

f

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published. Required fields are marked *